जेएसएम महाविद्यालयात मराठी भाषासंवर्धन पंधरवडा साजरा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी प्रतिवर्षी दि. 14 ते 28 जानेवारी हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने जे.एस.एम. महाविद्यालयात प्रा. डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. नीळकंठ शेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये मराठी भाषा संवर्धन : उपाययोजना या विषयावरील निबंधलेखन, मराठी भाषा महत्त्व व संवर्धन या विषयावरील घोषवाक्य लेखन, मराठी भाषा, म्हणी-वाक्यप्रचार व साहित्य यावरील प्रश्‍नांवर आधारित प्रश्‍नमंजुषा, लॉकडाऊनया विषयावरील कथालेखन, स्वातंत्र्याची 75 वर्षे या विषयांवरील स्वरचित काव्यलेखन अशा विविध स्पर्धांचे व काव्यवाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. काव्यवाचन उपक्रमात मराठी भाषेवरील कवितांचे वाचन करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय अशा दोन गटांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सर्व स्पर्धांमध्ये मिळून एकूण 237 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे ः कनिष्ठ महाविद्यालय ः – निबंध लेखन – प्रथम- मधुरा महेश धुरी, 11 वी विज्ञान. घोषवाक्य लेखन – प्रथम- सानिया पाटील, 11 वी विज्ञान. कथा लेखन- प्रथम- जान्हवी पाटील, 11 वी विज्ञान. काव्यलेखन- प्रथम – वैष्णवी कृष्णा पाटील, 11 वी विज्ञान. प्रश्‍नमंजुषा- प्रथम- श्रेया अधिकारी, 11वी कला.
वरिष्ठ महाविद्यालय ः- निबंध लेखन- प्रथम- साक्षी म्हात्रे, टी.वाय.बी.कॉम., घोषवाक्य लेखन- प्रथम- रिद्धी पाटील, एस.वाय.बी.कॉम. कथालेखन- प्रथम- तन्वी ठाकूर, एस.वाय.बी.ए., काव्यलेखन- प्रथम- सफा लियाकत बुरोंडकर, एस.वाय.बी.ए., प्रश्‍नमंजुषा- प्रथम – मयुरेश मोहन पाटील, एम.ए., मराठी. या स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुस्तक व प्रमाणपत्र या स्वरुपात पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

Exit mobile version