तळा येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

। तळा । वार्ताहर ।
तळा तहसील कार्यालय, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळा व तळा तालुका ग्रंथालाय विभागाचे संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त जागर माय मराठीचा काव्य, गझल, अभिवाचन, गीतगायन 28 जानेवारी रोजी बोरघर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून मराठी भाषा संवर्धन समितीचे चंद्रशेखर देशमुख अक्षरा कदम, तहसीलदार अन्नपा कनशेट्टी, गोविंद ओमासे, मकरंद बारटक्के, सुधीर शेठ, संजय गुंजाळ, अ.वि.जंगम, गटशिक्षणाधिकारी तांबट, पुरुषोत्तम मुळे, दीपक रसाळ,कानू विचारे, यशवंत मोंढे, रामदास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तळा, माणगाव, रोहा व मुरुड येथून आलेल्या कवींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या. प्रास्ताविक जितेंद्र म्हात्रे, हेमंत बारटक्के तर आभार विजय पवार यांनी मानले.

Exit mobile version