कुरुळ विद्यालयात मराठी भाषा दिन

| अलिबाग | प्रतिनिधी |
कुरुळ येथील सृजन प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय कुरुळ विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त अभिनेत्री आणि अभिवाचन कलाकार अलिबागची श्रद्धा पोखरणकर यांची मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी त्यांची छोटीशी मुलाखत घेतली,मुलाखतीच्या स्वरूपात त्यांची , त्यांच्या कामाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. पोखरणकर यांनी वविध भूमिका करताना येणारे अनुभव, त्यातील अडचणी, गंमती सांगितल्या. मराठी भाषेची गोडी, भाषा समृद्ध होण्यासाठी वाचनाचं महत्त्व हे रंजक पध्दतीने मुलांना सांगितलं. कार्यक्रमानंतर त्यांची सही घेण्यासाठी , त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मुलींनी कोंडाळ केलं होतं. श्रद्धा यांची इयत्ता पहिली मधली मुलगी वेणू हिने पण अगदी ठसक्यात माधुरी पुरंदरे लिखित हात्तेच्या या पुस्तकाचं अभिवाचन केलं.

Exit mobile version