उरण | वार्ताहर |
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेनेच्यावतीने कवीवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन तसेच मराठी राजभाषा दिन यानिमित्त उरण कोप्रोली येथे मराठी स्वाक्षरी मोहीमचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तरुणांनी व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मनसे मराठी कामगार सेना जिल्हा उपाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सत्यवान भगत, दिपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील, राकेश भोईर, अभय पाटील, बबन ठाकूर, निखिल पाटील, नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी संदेश ठाकूर, सत्यवान भगत सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मराठी बांधवांनी सदर मराठी स्वाक्षरी मोहीमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.