भारतीय संघातील मराठमोळं नाव

| मुंबई | प्रतिनिधी |

भारतीय संघ गुरुवारी (दि.4) मायदेशी परतला. दरम्यान, शुक्रावारी (दि.5) महाराष्ट्र शासनाकडूनही टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघात असलेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंचा आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंबरोबर गोलंदाजी प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू पारस म्हाम्ब्रे आणि मसाज थेरपिस्ट अरुण कानाडे यांचाही समावेश होता.

यातील मसाज थेरपिस्ट अरुण कानाडे हे सर्वांसाठी नवखे असले तरी जवळपास 9 वर्षांपासून ते भारतीय संघाशी जोडलेले आहेत. सामन्यावेळी किंवा सरावावेळी खेळाडूंना मसाज देण्याचे महत्त्वाचे काम ते करत असतात. मुळचे कळंबचे असलेले अरुण कानाडे हे 2015 मध्ये रमेश माने यांच्या जागेवर भारतीय संघात सामील झाले होते. रमेश माने यांनी जवळपास एक दशक भारतीय संघाबरोबर काम केले होते. त्यामुळे त्यांची जागा भरून काढण्याचे मोठे काम अरुण कानाडे यांना करायचे होते. ते त्यांनी चोख केल्याचे गेल्या अनेक वर्षात दिसून आले आहे. त्यांचे भारतीय संघातील खेळाडूंबरोबर अगदी खेळीमेळीचे नाते निर्माण झालेले आहे. त्यातही विराटशीही त्यांचे खास बाँडिंग आहे. 2011 ला त्यांना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मसाज देण्याची संधी मिळाली. ही संधी त्यांच्यासाठी आयुष्याला वळण देणारी ठरली होती.

Exit mobile version