रेल्वे स्टेशन नामकरणासाठी मोर्चा

| उरण । वार्ताहर ।

बोकडविरा आणि नवघर ग्रामस्थांनी गावाच्या हद्दीतील रेल्वे स्टेशनला हे गावाचे मुळ नाव द्यावे आणि रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, नोकरी, व्यवसाय आदी मागण्यासाठी द्रोणागिरी आणि न्हावा शेवा रेल्वे स्टेशनवर सोमवारी (दि.13) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा.एल.बी.पाटील यांनी रेल्वे प्रशासनाने गावकर्‍यांच्या मागणीचे गांभीर्याने विचार केला नाही तर रेल्वे समोर आत्महत्या करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

उरणच्या जनतेला प्रतिक्षा लागून राहिलेल्या खारकोपर ते रेल्वे या बहुप्रतिक्षित लोकल मार्गाचे उरणच्या भूमिपुत्रांनी स्वागत केले आहे. मात्र या दळणवळणाच्या विकास गंगेचा लाभ आम्हाला होणार का? असा सवाल या रेल्वे मार्गासाठी जमिनी देणार्‍या भूमिपुत्रांनी रेल्वे आणि सिडको प्रशासनाला केला आहे. खारकोपर ते उरण रेल्वे मार्गावरील बोकडविरा (द्रोणागिरी) आणि नवघर (न्हावा शेवा) स्थानकाच्या नाव आणि रेल्वे साठी जमिनी संपादीत होऊनही पुनर्वसन न झाल्याने निर्माण झालेला अस्मितेच्या मागणीसाठी बोकडविरा, नवघर ग्रामस्थ, ग्रामपंचायत, ज्येष्ठ नागरीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले आहे.

अनेकदा केलेल्या आंदोलनाच्या वेळी सिडको आणि रेल्वेने आश्‍वासन देऊनही ते पाळले नसल्याचे ग्रामस्थांच म्हणणे आहे. त्यामुळे प्रथम गावचे नाव व पुनर्वसनाच्या मागण्या मान्य करा नाहीतर होणार्‍या अन्यायाविरुद्ध सुरू करण्यात आलेले आंदोलन तीव्र करू, असा इशारा सिडको आणि रेल्वे प्रशासनाला यावेळी आंदोलनकर्त्या कडून देण्यात आले आहे. यावेळी मोर्चात प्रा.एल.बी.पाटील, कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील, अपर्णा मनोज पाटील, विजय भोईर, सविता मढवी, दिपक बंडा, गंधार पाटील, विश्‍वास तांडेल, समाधान तांडेल, मोहन भोईर, रंजना भोईर, अविनाश म्हात्रे, रत्नाकर पाटील, उषा बंडा यांनीही विचार मांडून प्रशासनावर टीका केली. याप्रसंगी मानसी पाटील, भगवान पाटील, रवी वाजेकर, महादेव बंडा, योगेश तांडेल, भूमीत भगत, अजय पाटील, सुरेश भोईर, एम.डी.भोईर, कुंदन बंडा, कृष्णा ठाकूर, रवी भोईर, आशा पाटील, गणेश भोईर, ज्ञानेश्‍वर तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version