आशा, गटप्रवर्तकांचा मोर्चा

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध प्रलंबित मागण्या मंजूर झाल्या असल्या तरी याबाबत लेखी आदेश शासनाने अजूनही काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागपूर विधानसभेवर दि.18 रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सघटनेचे राज्याध्यक्ष शंकर पुजारी यांनी दिली.

गेली अनेक वर्षे आशा व गटप्रवर्तक महिला आपल्या विविध मागण्यांसाठी वारंवार आंदेलने करीत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या महिन्यात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत राज्यातील 72 हजार आशा व 3672 गटप्रवर्तक 18 ऑक्टोबर 2023 पासून संपावर होत्या. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशांना 7 हजार रुपये व गटप्रवर्तकांना 6 हजार 200 रुपये वाढ व आशा व अटप्रवर्तकांना 2 हजार रुपये दीपावली भेट जाहीर केली होती. मात्र, याबाबत लेखी आदेश अजूनही निघालेले नाहीत. याचा असंतोष निर्माण झाला आहे. हे लेखी आदेश लवकरच निघण्यासाठी संघटनेने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. दि.18 रोजी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा सकाळी 11 वाजता नेहरू यांच्या उद्यानापासून नागपूर अधिवेशनावर काढण्यात येणार असल्याचे शंकर पुजारी यांनी सांगितले.

Exit mobile version