धनगर समाजाच्यावतीने उद्या अलिबागमध्ये मोर्चा

| अलिबाग | प्रतिनिधी |
धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबरोबरच इतर मागण्यांसाठी अलिबागमध्ये सकल धनगर समाजाच्यावतीने अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (दि.3) मोर्चा काढण्यात येणार आहे. हजारोच्या संख्येने धनगर समाज या मोर्चात सामील होणार आहे.

मराठा आरक्षणाबरोबरच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आजही लाल फितीत अडकून बसला आहे. धनगर समाजाने यासाठी अनेक वेळा लढे, उपोषणे आंदोलने केली. मात्र सरकारकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप समाजाच्यावतीने करण्यात आला आहे. सरकारचे लक्ष पुन्हा वेधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील धनगर समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

हा मोर्चा अलिबाग शहरातील क्रीडा भुवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असणार आहे. सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात हजारोच्या संख्येने धनगर समाज सहभागी होणार आहे. त्याची तयारी जोमाने सुरु आहे. गावागावात समाजाच्यावतीने चर्चा करण्यात आली असून बैठका घेण्यात आले आहेत. या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यातील धनगर समाजाने मोठ्या संंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था रायगडने केले आहे.

Exit mobile version