| रसायनी । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळाच्या कार्यक्षेत्रातील असलेल्या ठाणे, मुलुंड, भांडुप, नवी मुंबई, बेलापूर, पनवेल, तळोजा व उरण या भागामध्ये वीज वितरण करण्याचा परवाना मे.आदानी इलेक्ट्रिकल लिमिटेड नवी मुंबई या खासगी भांडवलदार कंपनीने विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेला आहे. अदानी इलेक्ट्रिकल कंपणीस वितरणाचा परवाना देऊ नये, राज्य सरकारने वीज कंपनीचे खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे,कंत्राटी पद्धतीने काम करणार्या कंत्राटी कामगाराला कायम करावे.
तिन्ही वीज कंपन्यातील 42000 रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी,दि.1.4.2019 नंतर कार्यान्वित केलेले उपकेंद्र ठेकेदारी पद्धतीने चालविण्यास देण्याची पद्धत बंद करावी,इंनपॅनमेंट द्वारे काम करण्याची पद्धत बंद करावी, महानिर्मिती कंपनीतील जलविद्युत केंद्र खाजगी भांडवलदारांना देण्यात येऊ नये. महाराष्ट्रातील जनतेच्या मालकीचा वीज उद्योग खाजगी भांडवलदारांना देऊ नये यास विरोध करण्याकरीता दि.2 जानेवारी 2023 रोजी निर्मिती,पारेषण,वितरण कंपन्यातील वीज कामगार, अभियंते,अधिकारी,कंत्राटी कामगार विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना,वीज ग्राहकांच्या संघटना यांचा विराट मोर्चा दुपारी 12 वाजता अधिक्षक अभियंता कार्यालय महावितरण कंपनी ठाणे येथून आयोजित करण्यात आला होता.
मोर्चामध्ये सहभागी होण्याकरीता 15000 हजाराच्यावर वीजकर्मचारी,अभियंते,अधिकारी,कंत्राटी कामगार,राजकीय पक्षाचे नेते,सामाजिक संघटनां व कामगार संघटनांचे नेते,वीज कंपन्यातील कंत्राटदार सकाळ पासूनच उपस्थित होते. या मोर्चाला सुरुवातीला ठाणे पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे हजारो कर्मचारी यांनी महावितरण कंपनी ठाणे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात कॉम्रेड कृष्णा भोयर,संजय ठाकूर,अरुण पिवळ,संजय मोरे,आर.टी. देवकात,सय्यद जहिरोदिन,राजन भानुशाली,राकेश जाधव,नवनाथ पवार,एस.के.लोखंडे,विवेक महाले,संदीप वंजारी,सुयोग झुटे,संजय खाडे, उत्तम पारवे,राजन शिंदे, नचिकेत मोरे,एस.एम.शरीकमसलत,शिवाजी वायफळकर, प्रकाश गायकवाड, प्रवीण वर्मा, आर.डी. राठोड,राजअली मुल्ला, मुकुंद हनवते, नेहा मिश्रा,प्रभाकर लहाने, नागोराव पराते,अनिल तराळे, आर.एच.वर्धे,ललित शेवाळे इत्यादी पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.