| चिपळूण | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरच्या सवतसडा धबधब्यानजीक गांजा विकण्यासाठी आलेल्या तरुणाला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी (दि.10) घडली. ऐन निवडणुकीत घडलेल्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाला असून याप्रकरणी राकेश वसंत पडवेकर (पेढे-कुंभारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून 19,560 रुपये किंमतीचा 326 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
राकेश हा मुंबई-गोवा महामार्गावरच्या सवतसडा धबधब्या नजीक गांजा विकण्यासाठी येत असल्याची गोपनीय माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागिय पोलीस अधिकारी प्रकाश बेले तसेच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण विभागाच्या सोमवारी सवतसडा धबधबा परिसरात सापळा रचला. अखेर त्याठिकाणी राकेश येताच त्याचावर या पथकाने धाड टाकली.
सुरुवातीला राकेश याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडून 19,560 रुपये किंमतीचा 326 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशा स्थितीत गांजा प्रकरणी राकेश पडवेकर याच्यावर झालेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या गांजाप्रकरणी आणखी कोणाचा तरी सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राकेश याने हा गांजा कोणाकडून आणला शिवाय तो कोणाला विकत होता? पोलीस चौकशीतून स्पष्ट होणार आहे.
गांजाची तस्करी उघडकीस
