तीन कोटींचा गांजा जप्त

सीमशुल्क विभागाची कारवाई

। मुंबई । प्रतिनिधी ।

बँकॉक गांजा तस्करीचे केंद्र बनत असून सीमशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकत्याच केलेल्या कारवाईत तीन किलो गांजासह एका आरोपीला अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या हायड्रोपोनिक गांजाची किंमत तीन कोटी रुपये आहे.

बँकॉकहून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर सापळा रचला होता. त्यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे एका संशीत प्रवाशाला सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी थांबवले. त्याची झडती घेण्यात आली. त्यांच्या बँगेत तीन किलो उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक गांजाचा सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत तीन कोटी रुपये आहे. मॅगी, बूट आणि चॉकलेटच्या काही वेष्टनात गांजा लपवण्यात आला होता. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने प्रवासी मोहम्मद शरीफला अटक केली. तो मूळचा केरळमधील रहिवासी आहे. तो मालमत्तांच्या दलालीचे काम करतो. या कामासाठी त्याला 20 हजार रुपये मिळाले होते. या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असून त्याबाबत सीमाशुल्क विभाग अधिक तपास करीत आहे.

Exit mobile version