। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबाग येथील स्वामी समर्थनगर पिंपळभाट येथे राहणाऱ्या कुटुंबाने विवाहित महिलेचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची घटना घडली आहे. २०१८ मध्ये विवाह झालेल्या स्वामी समर्थनगर पिंपळभाट येथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबाने २७ वर्षीय महिलेला हुंडयाकरीता छळ करून तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. या घटनेबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सपोनि जाधव हे करीत आहेत.
अलिबाग येथे विवाहितेचा छळ; आत्महत्या करण्यास केले प्रवृत्त
