| सुकेळी | प्रतिनिधी |
राजिप अंतर्गत नागोठणेजवळच असलेल्या वांगणी शाळेमध्ये ‘मार्केट डे’ या कार्यक्रमाचे सोमवारी (दि.5) आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांकडून अनेक दुकाने मांडण्यात आली होती. यामध्ये चायनीज, वडापाव, मेदुवडा, शिरा, लस्सी स्टॉल, स्वीट कॉर्नर, चटपटी भेळ, ईडली स्टॉल, अशा अनेक प्रकारची दुकाने विद्यार्थ्यांनी लावली होती. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून रायगड जिल्ह्य परीषदेच्या माजी सदस्या विजया ठाकूर तसेच ग्रुप ग्रामपंचायत वांगणीचे माजी सदस्य एकनाथ ठाकूर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या दुकानांमधून खरेदी करीत विद्यार्थ्यांची मने जिंकत त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला. तसेच गावातील नागरिकांनीदेखील या विद्यार्थ्यांकडून विविध वस्तूंची खरेदी केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संध्या तेलंगे, उपाध्यक्षा मीना तेलंगे, सर्व सदस्य, शिक्षकवर्ग, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.







