। आगरदांडा । प्रतिनिधी ।
गणेश उत्सव अगदी एका दिवसावरच येऊन ठेपल्याने मुरुड शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात व्यापारी व ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. उत्सवासाठी लागणा-या विविध वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक शहराच्या दिशेने येत आहेत. नविन व वेगळेपणा असलेल्या वस्तूंकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. बाप्पाच्या डेकेरोशनसाठी लागणारे साहित्य तसेच धार्मिक माटीसाठी लागणारे साहित्य घेऊन शहरा लगतच्या गावांमधील लोक वस्तु विकण्यासाठी आलेले दिसुन येतात. याकारणाने पुर्ण बाजारपेठ भरलेली दिसुन येते. यामुळे मोठ्या प्रमाणात वस्तुंची उलाढाल होत आहे. बाप्पाच्या आगमनाची तयारी तसेच कपड्यांच्या व वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजलेल्या दिसून येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्राॅफीक झालेले दिसुन येत आहे. या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुरुड पोलिस ठाण्यामार्फत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.