इंग्रजीच्या जागतिक स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी
| पाली/बेणसे | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील को.ए.सो लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मारोती भगत यांनी जागतिक स्पर्धेत जगात प्रथम क्रमांक पटकविण्याची प्रेरक व अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यांनी स्पेनमधील तेज इंग्लिश अकॅडमी या संस्थेने घेतलेल्या ‘इंग्लिश टीचर’ या इंग्रजी विषयाच्या जागतिक स्पर्धेत देदिप्यमान यश संपादन केले आहे. ग्रामीण भागात राहून आशिया खंडात संपूर्ण भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्राचार्य भगत यांच्या या कामगिरीने अलिबागसह रायगड जिल्हा व भारत देशाच्या नावलौकीकात भर पाडली आहे. त्यामुळे इंग्लिशवरील अफाट प्रभुत्वाने व असखलीत इंग्रजी संभाषण कौशल्याने प्राचार्य मारोती भगत यांचा जगात डंका गाजत आहे.
स्पेनमधील तेज इंग्लिश अकॅडमी ही संस्था दर आठवड्याला विविध जागतिक ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करत असते. गेल्या 11 आठवड्यांपासून 15 ते 21 जून या कालावधीत घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये मारोती भगत यांनी सहभाग नोंदवून 7,679 गुण प्राप्त करून त्यांनी प्रथम क्रमांकाचा मानकरी होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील प्राचार्य मारोती भगत यांचा इंग्रजी हा मूळ विषय नाही. त्यांनी सेवा निवृत्तीनंतर इंग्रजी विषयाचा व्यासंग वाढवला. त्यांनी इंग्रजी विषयाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आणि आपला इंग्रजी विषयाचा व्यासंग जागतिक पातळीवर सिद्ध केला. भगत यांनी मिळवलेल्या अद्वितीय यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि इंग्रजी विषयाच्या अभ्यासकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अभ्यासासाठीच मोबाइलचा वापर करावा
यावेळी बोलताना मारोती भगत यांनी, अत्याधुनिक तंत्रज्ञानात मोबाईलचा वापर विकसित होताना पालकांनी केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी, ज्ञान वृद्धीसाठीच मोबाइलचा वापर करावा, तर इतर कामासाठी मोबाईल वापर टाळावा. तसेच, इंग्रजीची कोणतीही मनात भीती न बाळगता इंग्रजीचा व्यासंग वाढवून, इंग्रजी बोलणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहून इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न केला तर लवकर इंग्रजी शिकता येते, असा सल्ला त्यांनी दिलाा. असा सल्ला दिला आहे. त्याचबरागबर विद्यार्थ्यांना इंग्लिशवर प्रभूत्व मिळावे यासाठी आपण इंग्लिशचे मोफत क्लासेस घेत असल्याची माहिती प्राचार्य भगत यांनी दिली.
काळानुरूप बदलत्या तंत्रज्ञान व सुधारणानुसार जीवनात आमूलाग्र बदल व परिवर्तन घडवून आणण्यासाठी मी पावले टाकली. अगोदर माझ्याकडे पाटी, पाठ्यपुस्तक व लेखणी होती. महाविद्यालयात आल्यानंतर इंग्लिश साहित्य आले, त्यावर मी लक्ष केंद्रित केले. आता अँड्रॉइड मोबाईलचा जमाना असून, मोबाईल सोबत खेळण्यापेक्षा अभ्यासक्रमाचे जे भाग आहेत त्यावर लक्ष केंद्रित करतो. व्यवसायाभिमुख स्पेन, पोलंड , जॉर्डन या कंपन्या इंग्रजी भाषेशी संलग्न विविध स्पर्धा घेतात. या जागतिक स्थरावरच्या ऑनलाइन स्पर्धेत आशिया खंडातून भारताचे प्रतिनिधित्व करून मी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विद्यार्थ्यांनी इंग्लिशचा व्यासंग धरून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवले पाहिजे. नियमीत सरावाने ते सहज शक्य आहे.
मारोती भगत,
प्राचार्य







