। मालेगाव । प्रतिनिधी ।
तरुणाकडून वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मालेगावच्या रमजानपुरा भागात घडली. विशेष म्हणजे मृत विवाहितेचे दीड महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र, आसिफ नावाचा तरुण सतत फोन करून पिडितेला त्रास देत होता. त्या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली. तशी सुसाईट नोट पिडितेच्या वडिलांना मिळाल्याने या प्रकाराला वाचा फुटली. वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून त्रास देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा रमजानपुरा पोलीस अधिक तपास करीत आहे.







