दोघांविरोधात गुन्हा दाखल
। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुनम सिंग असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती गिरीश वत्स आणि सासू सुमन सुभद्रा कुवर यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुनम सिंग यांचे लग्न एप्रिल 2025 मध्ये गिरीश वत्स यांच्याशी चंद्रपूर येथे झाले. ते खारघर सेक्टर 35 जी येथे राहण्यासाठी आले. मात्र त्यांच्यात भांडण होत होती. बाहेरून पैसे आणण्यासाठी तिच्या मागे तगादा लावत होते आणि तिला मानसिक त्रास देत होते. त्यामुळे बुधवारी (दि.5) लोखंडी हुकाला गळफास घेऊन पुनम हिने आत्महत्या केली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.






