| उरण | प्रतिनिधी |
तालुक्यातील चिरनेर गावामधून 30 वर्षाची विवाहित महिला घरात कुणासही काही न सांगता अचानकपणे बेपत्ता झाल्याने परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. याबाबत उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिरनेर येथील सुधीरशेठ याच्या चाळीत उरण येथे ही विवाहित महिला आपल्या पतीसह वास्तव्यास होती. परंतु, ती अकस्मात बेपत्ता झाली आहे. या घटनेची तक्रार तिचे पती हिंदकुमार राजेश कुशवाह यांनी उरण पोलीस ठाण्यात केली आहे. बेपत्ता असणाऱ्या महिलेचे पूर्ण नाव सवनाबाई हिंदकुमार कुशवाह असून तिची उंची 145 सेंटी मीटर, रंग गोरा, मजबूत बांधा, नाक सरळ, केस विरळ, डोळे काळे, गोल चेहरा, उजव्या हातावर सवाना असे नाव गोंदवीले आहे. तालुका उरण-गाव चिरनेर येथील सुधीरशेठ याच्या चाळीत तिचे सध्याचे वास्तव्य असून, मूळ राहणार राज्य मध्यप्रदेश येथील जिल्हा सतना गाव कुशली पोस्ट ऑफिस इचौल येथील मूळ रहिवासी आहे. चिरनेर येथील घरांतून जातेवेळी अंगात लाल रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची जीन पँट परिधान केलेली आहे. सदर तरुणीचा शोध उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस घेत आहेत.







