| खालापूर | प्रतिनिधी |
खोपोली शहरात पतीच्या ओळखीच्या मित्राकडूनच विवाहितेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खालची खोपोली परिसरात ही घटना घडली. शनिवारी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास पीडिता घरात एकटी असताना तिच्या पतीचा ओळखीचा मित्र जबरदस्तीने घरात घुसला आणि त्याने तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर पीडितेने खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.






