शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण

| महाड । वार्ताहर |

आजच्या पिढीला शारीरिक व्यायाम व शिवकालीन युद्धकलेचे महत्त्व पटावे, या उद्देशाने महाड येथे छत्रपती श्री संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गदुर्गेश्‍वर रायगड यांच्या वतीने शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण सुरू केले आहे. त्याला मुले व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती श्री संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गदुर्गेश्‍वर रायगड आयोजित शिवकालीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण शिबिर 2023 या साहसी उपक्रमाची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे. श्री वीरेश्वर मंदिरासमोरील शाळा क्रमांक दोनच्या मैदानात हे प्रशिक्षण 1 मे पर्यंत सुरू आहे. पहिल्या दिवशी जवळपास 40 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत तर वेगवेगळ्या वयोगटातील एकूण 60 इच्छुकांनी नोंदणी केली आहे. समीर पवार आणि महाराणा प्रताप मित्र मंडळाकडून प्रशिक्षण दिले जात असून यात लाठी काठी, दांडपट्टा, भाला, ढाल, तलवार इ. शस्त्रांचा प्रामुख्याने यात समावेश आहे.

Exit mobile version