मार्टिनेक्ष जुलैमध्ये भारतात

| नवी दिल्ली | वार्ताहार |

फुटबॉल विश्‍वविजेता अर्जेंटिना संघाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ प्रचारात्मक भेटीसाठी जुलै महिन्यात भारतात येत आहे. 30 वर्षीय मार्टिनेझ जुलैमध्ये दोन दिवस कोलकात्यात असेल, अद्याप याची तारीख जाहीर झाली नाही. मार्टिनेझ 2022 चा फिफा विश्‍वचषक जिंकणार्‍या अर्जेंटिनाचा गोलकीपर होता. अंतिम फेरीत गोलकीपरने दोन सेव्ह केले. त्याला गोल्डन ग्लोव्हज पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षकाला दिला जातो.

Exit mobile version