हुतात्मा गौरव पुरस्कार जाहीर

आयएएस जुईकर आणि राजाराम खडे यांना पुरस्कार
। नेरळ । प्रतिनिधी ।
गेली 17 वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या हुतात्मा स्मारक समितीकडून देण्यात येणारे हुतात्मा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हुतात्मा स्मारक समितीकडून या पुरस्कारांची घोषणा केली असून रायगड जिल्ह्यातील पहिले थेट आयएएस झालेले प्रतीक चंद्रशेखर जुईकर आणि माथेरानच्या डोंगरात कड्यावरचा गणपती साकारणारे निवृत्त रेल्वे मोटरमन राजाराम खडे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावर्षी 2 जानेवारी 2022 रोजी सिद्धगड बलिदान दिन कार्यक्रम हुतात्मा चौकात साजरा होणार असून दोन्ही हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे. या कार्यक्रमात हुतात्मा गौरव पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी गौरव पुरस्कार कर्जत तालुक्याचे सुपुत्र आणि रायगड जिल्ह्यातील पहिले थेट आयएएस अधिकारी बनलेले प्रतीक चंद्रशेखर जुईकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचवेळी माथेरानच्या डोंगरात एका दगडात कड्यावरचा गणपती साकारला आहे. रेल्वे मोटरमन म्हणून सेवा करताना हा महाकाय दगडात गणपती साकारला आहे .या दोन्ही मान्यवरांना हुतात्मा गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल असे हुतात्मा स्मारक समितीकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जाहीर केले आहे.
या सोहळ्यास आ.महेंद्र थोरवे, माजी आ.सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुषमा ठाकरे, कर्जत हसीलदार विक्रम देशमुख, कर्जत पंचायतच्या उपसभापती जयवंती हिंदोळा, नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नेरळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती राहील अशी माहिती हुतात्मा स्मारक समिती यांच्याकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version