| अलिबाग | वार्ताहर |
कारगिल युध्दात निलेश तुणतुणे शहीद झाले. त्यांचा 27 वा स्मृतिदिन शुक्रवारी (दि.1) सहाणगोठी येथे आयोजित करण्यात आला आहे. शहीद निलेश तुणतुणे ट्रस्ट व पंचायत समिती अलिबाग यांच्या संयुक्त विदयमाने हा समारंभ होणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, पोलिस निरीक्षक किशोर साळे, निवृत्त लष्कर अधिकारी कॅप्टन उमेश वाणी, निवृत्त लष्कर अधिकारी कर्नल एन.डी. जानकर, माजी सैनिक अमरनाथ राणे, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, आदिवासी समाज कायदेशीर सल्लागार ॲड. के.डी. पाटील, शहिद निलेश तुणतुणे ट्रस्टचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शहिद निलेश तुणतुणे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण केले जाणार आहे. यावेळी पोलीस दलाकडून सलामी देण्यात येणार आहे. रायगड जिल्हा परिषद झिराड प्राथमिक शाळा व चोंढी – किहीम येथील स. म. वडके हायस्कूलमधील विद्यार्थ्यांमार्फत सलामी देण्यात येणार आहे. रायगड जिल्हा परिषद खानाव व बामणगाव हायस्कूलमधील मधील विद्यार्थ्यांकडून लेझीम व कलापथकामार्फत कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.







