जयंत पाटील यांच्याकडून कोळी कुटुंबियांचे सांत्वन

। अलिबाग । वार्ताहर ।

नवगांव येथील बोरेश्‍वर मच्छिमार सोसायटीचे चेअरमन तथा शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते दत्ताराम मारूती कोळी यांच्या वडीलांचे रविवारी (दि.15) निधन झाले. मारूती बामा कोळी असे त्यांचे नाव असून निधनासमयी ते 84 वर्षांचे होते. मारूती कोळी हे मच्छिमार सोसायटीचे माजी चेअरमन कै. बामा सखे यांच्या होडीवर 20 वर्षे तांडेल म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्‍चात 3 मुले, 1 बहिण व नातवंड असा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य गुरूवारी (दि.26) होणार असल्याचे कोळी कुटुंबियांकडून सांगण्यात आले. दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आ. जयंत पाटील यांनी दत्ताराम पाटील यांच्या निवास स्थानी जाऊन कोळी कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी नवगाव मच्छिमार सोसायटीचे माजी चेअरमन सुरेंद्र कटोर, श्रीरंग कटोर, नरेंद्र थळकर तसेच रायगड बाजारचे व्हाईस चेअरमन प्रमोद घासे व आरडीसीसी बँकेचे डेप्युटी सीईओ वाघमोडे उपस्थित होते.

Exit mobile version