जेएनपीटी | वार्ताहर |
नवी मुंबई विमानतळाचे दि.बा.पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण करावे, या मागणीसाठी कृती समितीच्यावतीने सोमवारी जासई येथे मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि दिबा समर्थक मोठ्या संख्येेने उपस्थित होते. 9 ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून दि.बा.पाटील यांच्या नावासाठी जासई येथून पेटविलेली ही मशाल लोकांमध्ये प्रकाश पाडून हा नामांतरणाचा लढा यशस्वी करील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
विमानतळ नामांतरणासाठी जासईत मशाल मोर्चा
