एपीएमसीत व्यापार्‍यांकडून सामूहिक चोपडी पूजन

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

दिवाळीतील लक्ष्मी पूजनला सर्वत्र लक्ष्मी प्रतिमा त्याच बरोबर आपल्या घरातील लक्ष्मी, वाहने इत्यादींचे पुजन केले जाते. सर्वत्र लक्ष्मी पूजन उत्साहाने साजरा करण्यात आला. डिजिटल युगात ही एपीएमसी मधील व्यापारी यांनी संगणकीय युगातही त्यांच्या हिशेबाच्या वहीचे अर्थात चोपडी पुजनाची परंपरा कायम राखत यंदा ही आपल्या चोपडीचे पूजन करून नव्याने कामाला सुरुवात केली आहे.

वाशीतील मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा, भाजीपाला, फळ, मसाला आणि अन्नधान्य या पाचही बाजारात व्यापार्‍यांसाठी आजचा लक्ष्मी पूजन दिवस खूप महत्वाचा मनाला जातो. व्यापारी आपले नित्याचा व्यवसाय, व्यवहाराची नोंद आपल्या वहीत म्हणजेच चोपडीत करून ठेवायचे. आज चोपडी व्यवहाराची जागा संगणकीय व्यवहाराने घेतली आहे.

संगणका वरील नोंदी आज जरी सोयीस्कर ठरत असल्या तरीही आजही व्यापार्‍यांना आपली चोपडीचे महत्व आज ही टिकून आहे. दरवर्षी नित्यनेमाने व्यापारी आपल्या चोपडीचे पूजन करून नवीन व्यापारी वर्षाला सुरुवात करतात. आज चौपड्याची विधिवत पूजा करून त्याच्यावर आपले व्यवहार नोंदवले. बाजारात चोपडी पूजन बरोबरच व्यापार्‍यांनी आपल्या वजन काट्याचे ही पूजन केले.

Exit mobile version