। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत परिमंडळ 2 हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यात सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या पटांगणात परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जन गण मन सामूहिक राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल शहर, ग्रामीण, कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, खारघर, तळोजा, उरण, न्हावाशेवा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वाखाली सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रगीत गायनानंतर भारत माता की जय मवंदे मातरम च्या घोषणांनी पोलीस ठाणे परिसरात राष्ट्रभक्तीचे चैतन्य सळसळत होते.