कृषी दिनानिमित्त सामूहिक वृक्षारोपण

| कर्जत | प्रतिनिधी |

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याच्या हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित होणारा कृषी दिन कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात पार पडला. यावेळी सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी.डी. वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी डॉ. महेंद्र गवई, डॉ. नामदेव म्हसकर, डॉ. मीनाक्षी केळुस्कर, डॉ. जीवन कदम, महेशकुमार, रावे विद्यार्थी ज्ञानेश्वर पाटील, अथर्व शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन केले. कृषी दिनानिमित्त सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, मजूर तसेच रावे विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेऊन श्रमदानातून येथील केंद्राचा भात पैदास विभाग, उद्यानविद्या विभाग, विश्रामगृहासमोरील परिसर व मॉडेल कृषी विद्या विभागात मोठ्या प्रमाणावर सामूहिक वृक्षारोपण करत जवळपास 480 वेगवेगळ्या फळे आणि शोभिवंत प्रकारातील वृक्षांची लागवड केली. केंद्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता.

Exit mobile version