महाड एमआयडीसीमध्ये ब्ल्यू जेट कंपनीत भीषण आग

| रायगड | खास प्रतिनिधी |

महाड तालुक्यातील एमआसडीसीत अनेकदा आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर उपाययोजना करण्यात प्रशासन उदासीन असल्यामुळे असे प्रकार वारंवर घडत असून शुक्रवारी (दि.3) ब्ल्यू जेट कंपनीत भीषण आग लागली.यामध्ये कंपनीतील काही कर्मचारी अडकल्याची भीती आहे. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कंपनीत काम करणारे एकूण 7 व्यक्ती जखमी झालेल्या असून इतर 11 व्यक्ती मिसिंग असल्याची माहिती मिळत आहे.

ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड ही कंपनी रायगडमधील महाड MIDC मध्ये आहे. या कंपनीत सकाळी 11च्या सुमारास मोठा आवाज झाला. हा आवाज स्फोटाचं असल्याचं क्षणार्धात लक्षात आलं. या स्फोटामुळे सगळीकडे धावपळ सुरु झाली. या स्फोटानंतर कंपनीच्या प्लांटमध्ये असलेल्या एका रिएक्टर्सचा देखील स्फोट झाला. यामुळे येथील आग पसरली गेली आणि त्यानंतर रिएक्टर्सचे एका मागून एक असे स्फोट होत गेले. या स्फोटांच्या दणक्याने कामगार आपला जीव वाचविण्यासाठी जिकडे वाट मिळेल तिकडे पळू लागले. शेजारी असलेल्या विरल, झुआरी, आणि अक्वाफार्म या कंपनीतील कामगारांनी देखील कंपनी बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. ज्या प्लांटला आग लागली त्या प्लांटच्या शेजारीच विरल कंपनीचा प्लांट असल्याने विरल कंपनीच्या कामगारांनी आग विझवण्यास सुरुवात केली. या स्फोटात कंपनीच्या प्लांटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्ल्यु जेट हेल्थकेअर कंपनीत सुमारे सतरा कामगार काम करत होते. आग लागताच अनेकजणांनी कंपनी बाहेर पळ काढला. मात्र प्लांट मध्ये काम करणारे कामगार जखमी झाले आहेत. या कामगारांना महाड उत्पादक संघटनेच्या हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल केले आहे.

दरम्यान या घटनेचे वृत्त समजतात महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार महेश शितोळे, पोलीस उपविभागीय अधिकारी काळे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती आंधळे व एमआयडीसी मधील अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. महाड औद्योगिक वसाहती मधील गेल्या एक महिन्याच्या कालावधीतील ही दुसरी घटना असून यामुळे महाड औद्योगिक वसाहती मधील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या स्फोटामध्ये कंपनीचे प्रचंड नुकसान झाले असून कंपनीत काम करणारे एकूण 7 व्यक्ती जखमी झालेल्या असून इतर 11 व्यक्ती मिसिंग असल्याची माहिती मिळत आहे. आग कमी करण्यासाठी अग्निशामन दलाचे व पोलीसांचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. सध्या प्रशासनाकडून सर्व उपयोजना करण्यात येत आहेत. जखमी कामगारांना महाड उत्पादक संघटनेच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मयूर निंबाळकर (जळगाव), राहुल जीराणी (धुळे), स्वप्निल आंब्रे (खेड), निमाई मुरमक (ओरिसा) व विक्रम ढेरे (भोर) अशी जखमींची नावे असून इतर दोघांची नावे उपलब्ध नसून यांच्यावर एमएमए रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील विक्रम डेरे हा गंभीर रित्या जखमी झाला असल्याने त्याला मुंबई येथे अधिक उपचार करता स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती कंपनी प्रशासनाने दिली.

Exit mobile version