महाडमधील गादी कारखान्याला भीषण आग

। महाड । प्रतिनिधी ।

महाडमधील एका गादी कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये शेजारी असलेल्या प्लॅस्टिक मॉलला मोठा फटका बसला आहे.

महाड शहरातील संत रोहिदास नगर परिसरात असणाऱ्या गादी कारखान्याला गुरूवारी (दि.26) सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये शेजारी असलेल्या प्लॅस्टिक मॉलला मोठा फटका बसला असून मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळली आहे. आगीचे वृत्त समजताच महाड नगरपरिषदेचा अग्निशामन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. तेथील नागरिकांनी आग विझवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केल्यामुळे आगीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे शक्य झाले. या घटनेमूळे महाड शहरातील अग्निशमन प्रतिबंधात्मक उपाय योजने संदर्भात स्थानिक प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महाडमधील गेल्या काही वर्षात लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून अधिक तीव्रतेने कार्यवाही अपेक्षित असताना महाडमधील मुख्य बाजारपेठेमध्ये अशा दुकानातून आवश्यक असणारी अग्निशमन यंत्रणा होती का? याबाबत शासनाने प्रत्यक्ष खुलासा जाहीर करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version