। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दिल्लीतील मालवीय नगरमध्ये आगीची भीषण घटना घडली असून, एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत होरपळून 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दिल्लीतील लेमन ग्रीननावाच्या रेस्टॉरंटमध्ये बुधवार सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. याबाबत माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवाने घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर येथील इमारतीमधून 37 नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सध्या जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु असून, आतापर्यंत ४० जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीनंतर वरच्या मजल्यावर अडकून पडलेल्या नागिकांनी रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या गाद्यांवर उड्या घेतल्या. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही; मात्र प्राथमिक माहितीनुसार त्या हॉटेलमधूनच आग लागल्याची शक्यता आहे.”
दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग; 21 जणांचा होरपळून मृत्यू
