एक्स्प्रेसवेवर टेम्पोला भीषण आग

सुदैवाने जीवितहानी टळली
| खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अंडा पाँईटजवळ शुक्रवारी रात्री मेडसिनल केमिकल मालवाहू टेम्पोला भीषण आग लागली. काही वेळ अंग्नीतांडव परिस्थितीमुळे वाहतुककोंडी झाली होती. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहचल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीमुळे एक्सप्रेसवरील वाहतुक बोरघाटातून वळवली. सुदैवाने त्यातील कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र काही कोंबड्या मृत पावल्याने नुकसान झाले आहे.

आगीच्या ज्वाळा आजूबाजूला पसरत होत्या त्यामुळे बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांनी दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली. आग विजविण्यासाठी खोपोली नगरपालिकेचे अग्निशमन दल व पेण नगरपालिकेने मदत केली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळावर सर्व यंत्रणांना सहकार्य केले. जवळपास दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, होमगार्ड इत्यादी परिस्थिती पूर्ववत करण्याचे काम केले.

Exit mobile version