महापे एमआयडीसीतील कंपनीत भीषण आग

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील ‘बिटाकेम केमिकल’ या कंपनीला शनिवारी (दि.24) अचानक भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच याग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, शॉर्ट सर्किटमुळे किंवा केमिकल रिअ‍ॅक्शनमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Exit mobile version