अंधेरीतील इमारतीला भीषण आग

| मुंबई | प्रतिनिधी |

अंधेरी पश्चिमेकडील एका बहुमजली इमारतीतील 11 व्या मजल्यावर काल रात्री भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत एका 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. तर आणखी एक इसम जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिमेकडील लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट भागातील ओबेरॉय कॉम्प्लेक्स येथील एका बहुमजली इमारतीच्या 11 व्या मजल्यावर अचानक आग लागली. इमारतीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाने तातडीने अग्निशमन दलाला फोन करून या घटनेची माहिती दिली. आगीचे वृत समजताच 15 मिनिटांच्या आतच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी प्रयत्नांची शर्थ करत आगीवर नियंत्रण मिळवत ती विझवली. या अपघातात एक वृद्धासह आणखी एक व्यक्ती असे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना अग्निशमन दल आणि स्थानिक लोकांच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यापैकी 75 वर्षीय वृद्ध इसम राहुल मिश्रा यांचे निधन झाले . तर रौनक मिश्रा (38) याची प्रकृती आता ठीक असून त्यांच्यावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Exit mobile version