शेकापचे कार्यकर्ते राम कडू यांना मातृशोक

। हमरापूर । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील धोंडपाडा गावचे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामपंचायतचे माजी सदस्य राम कडू यांच्या आई आनंदीबाई गोविंद कडू यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले व दोन मुली, नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीस शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्र (हरिओम), सरपंच महेश पाटील व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version