। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
शहरातील प्रसिध्द सुवर्णकार आणि राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या मातोश्री श्रीमती माधुरी अनिल मालपेकर (68) यांचे रविवारी सकाळी 10.30 रहाते घरी अल्पशा आजाराने निधन झाले. एक शांत, संयमी व मितभाषी व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. सामाजिक आणि धार्मिक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रीय सहभाग राहिला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा संदीप, आनंद, रोहीत असे तीन मुलगी लिना, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.