माथेरान गारठले; पारा 11.06 अंशावर

| नेरळ | प्रतिनिधी |

प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान हे उत्तरेत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. मात्र, या पर्यटन हंगामातील सर्वात थंड गार दिवस म्हणून आजच्या दिवसाची नोंद झाली आहे. आज (दि.14) माथेरानचे तापमान 11.06 अंश इतके खाली आले होते. दरम्यान, गतवर्षी याच महिन्यात 24 तारखेला 07.06 अंश सेल्सिअस एवढा खाली पारा आला होता.

थंड हवेचे आणि गुलाबीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरान हे थंड हवेचे ठिकाण थंडीने गारठले आहे. माथेरानमध्ये गुलाबी थंडी कडाक्याची पडली असून, पार्‍याने या वर्षातील सर्वाधिक नीचांक गाठला असून, शनिवारी पारा 11.06 अंश इतका खाली आला होता. या वर्षातील हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान असलेला आजचा दिवस ठरला आहे.

आज माथेरानचे हवामान एवढे थंड होते कि भर उन्हात सुद्धा थंडी जाणवत होती. सकाळपासून थंडीचा जोर होता तो संध्याकाळ पर्यंत वाढतच गेला. त्यात विकेंड असल्याने पर्यटकांसह स्थानिकांनीही या गुलाबी कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेतला. सोमवारी सकाळी 8.30 वाजता नगरपालिकेचे तापमान निरीक्षक अन्सार महापुळे यांनी 11.06 अंश इतका नोंदवले गेल्याची माहिती दिली.

तापमान
माथेरानच्या इतिहासातील सर्वात जास्त थंडी गतवर्षी 24 जानेवारी रोजी होती आणि त्यावेळी पारा तब्बल 07.06 अंश इतका खाली आला होता. मागील वर्षी 10 जानेवारी रोजी 10.06 अंश, तर 9 जानेवारी रोजी 13.06 अंश आणि 2 डिसेंबर 2021 रोजी पारा 14.08 अंश इतका खाली आला होता.

माथेरानमध्ये गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक येत असतात. त्यामुळे पारा दहा पर्यंत खाली येणे ही माथेरानमधील पर्यटनवाढीसाठी चांगली बातमी आहे

सुरेखा भणगे
मुख्याधिकारी आणि प्रशासक माथेरान नगरपरिषद
Exit mobile version