माथेरान घाटरस्ता बनला सुरक्षित

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ-माथेरान हा घाटरस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरक्षित बनविण्याचे उद्दिष्ट ठेवल्यानंतर आता हा घाटरस्ता सुरक्षित बनला आहे. घाट रस्त्यावर संरक्षक कठडे, संरक्षक भिंती, दरडी कोसळणार अशा ठिकाणी लोखंडी जाळ्या अशी कामे झाल्याने वाहनचालकांसाठी हा रस्ता सुरक्षित बनला आहे. माथेरान या पर्यटन स्थळी येणारे पर्यटकांचा प्रवास सुखकर झाला असल्याने पर्यटक देखील सरकारचे आभार मानत आहे.

माथेरान या पर्यटन स्थळी जाणारी नेरळ-माथेरान मिनीट्रेन रेल्वेच्या संपामुळे बंद झाली होती. त्यावेळी माथेरानमधील लोकांचे येणे-जाणे बंद झाले होते. त्यावेळी माथेरानमधील ग्रामस्थांनी माथेरान दस्तुरी नाका येथून नेरळकडे जाणारा रस्ता बनविण्यासाठी ग्रामस्थनांनी श्रमदान केले. त्यांनतर माथेरान-नेरळ घाटरस्ता सुरु झाला. त्यानंतर 1982 मध्ये माथेरान घाटरस्त्यावर वाहने सुरु झाली. त्यानंतर एकेरी आणि अरुंद अशा रस्त्यावर वाहतूक करणे मोठे जिकरीचे होते. त्यामुळे माथेरान घाट बाहेरून येणार्‍या पर्यटकांच्या वाहनांना अपघात होत होते. त्यानंतर तत्कालीन सरकार आल्यावर कोकण पॅकेजमधून माथेरान घाटरस्त्याचे रुंदीकरण करण्याचा पहिला प्रयत्न झाला. त्यावेळी खर्‍या अर्थाने नेरळ-माथेरान रस्ता अपघात मुक्त होण्यास सुरुवात झाली.

Exit mobile version