| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत- नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर माणगाव येथील डिग्निटी लाईफस्टाईल फाट्यावर माथेरान दिशेकडे जाणाऱ्या मिनी बस ने प्रवासी रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक जखमी झाला असून, रिक्षाचालकावर रायगड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.
कर्जत- कल्याण राज्य मार्गावर ग्रुप ग्रामपंचायत मांणगाव हद्दीमध्ये डिगनेटी लाइफस्टाईल येथे रिक्षा व बसची धडक झाली. या अपघातामध्ये रिक्षा चालक याला किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यानंतर जखमी रिक्षाचालक अफजल डोळसे यांना पुढील उपचारासाठी रायगड हॉस्पिटल येथे नेण्यात आले. प्रवासी रिक्षा चालक हे कर्जत दिशेकडून नेरळ दिशेकडे जात होते. तर कर्जत माथेरान बस देखील कर्जत कडून माथेरानला प्रवासी घेऊन जात होती. या प्रवासी मिनी बसने मागील बाजूने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा काही अंतरावर जाऊन पलटली. या अपघातात रिक्षामध्ये एक प्रवासी आणि रिक्षा चालक असे दोघेजण होते. मात्र, सुदैवाने या घटनेमध्ये त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. तर रिक्षाचालक हे जखमी असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, यामध्ये रिक्षाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.







