| माथेरान | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील शंभरी पार केलेल्या माथेरान या कवर्गाच्या नगरपरिषदेच्या कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या कार्यालयात राज्य संवर्ग पदे 13 आहेत. यातील केवळ चार पदे भरलेली असून, अद्यापही नऊ पदे रिक्त आहेत. वर्ग 3 च्या एकूण 16 पदांपैकी फक्त 5 पदे भरली असून, 11 पदे रिक्त आहेत. वर्ग 4 ची एकूणच 45 पदे आहेत. यातील 37 पदे भरलेली असून, 8 पदे रिक्त आहेत. मागील सहा ते सात महिन्यांपासून मुख्याधिकारी रुजू नाहीत, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.







