जिल्हयातील ‘या’ ठिकाणी देशातील सर्वाधिक पाऊस

महिनाभरात गाठली 3109 मि.मी. सरासरी

| नेरळ | प्रतिनिधी |

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. दि.22 जून रोजी सुरु झालेला पाऊस आणि त्यानंतर मागील महिनाभरात माथेरानमध्ये कोसळलेला पाऊस हा देशात क्रमांक एकवर आहे. माथेरानमध्ये दि.22 जून ते 22 जुलै या महिन्याभरात तब्बल 3109 मिली इतका पाऊस झाला आहे. त्यात दि.20 रोजी तब्बल 380 मिली इतका प्रचंड पाऊस माथेरानमध्ये झाला.

माथेरानमध्ये यावर्षी मागील महिनाभरात सतत पाऊस सुरु होता. संततधार पावसाने माथेरानमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. यावर्षीचे पर्जन्यमान हे देशात अव्वल क्रमांकाचे आहे. यावर्षी माथेरानमध्ये साधारण दि.21-22 जून या कालावधीत पाऊस सुरु झाला. मागील महिनाभरात तब्बल 3109 मिली इतका प्रचंड पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील देशातील ही सरासरी सर्वात अधिक आहे.

माथेरानमध्ये दि.19 आणि 20 मध्ये प्रचंड पाऊस सुरु होता. त्यावेळी दि.20 रोजी तब्बल 380 मिली इतका पाऊस झाला आहे. याबाबत माथेरानमध्ये झालेले पर्जन्य मोजण्याची यंत्रणा येथील सर्वात उंच भाग असलेल्या पे मास्टर पार्क येथे आहे. तेथे पालिकेचे स्वच्छता आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी अन्सार महापुळे यांच्याकडून दररोजच्या पर्जन्य झाल्याचे नोंदी घेण्यात येतात. तर, तरुण अभ्यासक श्रेयस गायकवाड यांनी देशातील पर्जन्य आणि माथेरानमधील पर्जन्य याचे ताळेबंद बांधले असता त्यांना माथेरानमध्ये मागील एका महिन्यात झालेला पाऊस हा देशात सर्वात जास्त आहे, असे निदर्शनास आले आहे. देशात बहुसंख्य ठिकाणी मान्सूनचा पाऊस सुरु होऊन महिना झाला आहे. त्यामुळे माथेरानमधील हा पाऊस उच्चांक गाठतो, हे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version