माथेरानने गाठले उच्चांकी तापमान

। माथेरान । वार्ताहर ।

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानने मंगळवारी (दि.16) उच्चांकी तापमान गाठले असून अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच चाळिशीपर्यंत तापमान गेल्याने येथील पर्यटनाबाबतच चिंता निर्माण झाली आहे. थंड हवेच्या ठिकाणी जर इतके तापमान असेल तर येथे येणार्‍या पर्यटकांचा ओढा आपसूकच कमी होणार. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनासाठी ही धोक्याची घंटा आहे. दुपारनंतर येथील वातावरणामध्ये कमालीचा बदल घडत असून ढगाळ वातावरणामुळे गर्मी वाढत असल्याचे चित्र आहे. संध्याकाळच्या वेळी मात्र थंड हवा सुटल्याने नागरिकांना दिलासा मिळत असतो. परंतु, आगामी काळामध्ये ही वाढत जाणारी गर्मी पर्यटन स्थळासाठी धोक्याची घंटा असल्याने आतापासूनच माथेरान वाचवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. माथेरानमधील स्थानिकांना इतक्या गर्मीची सवय नसल्याने आजाराचे प्रमाण वाढत असून गर्मीपासून बचावारिता नागरीक दिवसा घराबाहेर पडत नसल्याने येथील बाजारपेठेत शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.

Exit mobile version