माथेरानच्या वाहनकर ठेक्याचा लिलाव

तीन वर्षांकरिता तब्बल एक कोटी पाच लाखांची बोली

| कर्जत | प्रतिनिधी |

माथेरान नगरपालिकेकडून वाहन कर संकलित करण्याच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत सहा कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवून लिलावात भाग घेतला होता. त्यामध्ये चिन्मय ईटरपाईजेस, फायरविंग इन्फ्राकॉन कर्जत, जे.एम.म्हात्रे पनवेल, आर.बी.बॉणङवे, शनिराज पे ॲङ पार्क यांनी ह्या निविदेत सहभाग घेतला होता.

निविदा प्रकिया लिलावाची असल्याने नगरपालिकेची डिमांड 55 लाख रुपयांची होती. त्यावर जो जास्त बोली लावेल, त्याला हा ठेका मिळणार होता. या लिलावाला सकाळी नऊ वाजता सुरूवात झाली. प्रत्येकाने आपली बोली वीस हजार व त्यापेक्षा कितीही रूपयाने वाढवायची होती. सकाळी नऊ वाजता सुरू झालेली बोली संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 95 लाखापर्यंत पोहोचली. शेवटी चिन्मय इंटरपाईजेस या कंपनीने एक कोटी पाच लाख रुपये बोली लावून हा लिलाव जिंकला. या लिलावात नगरपालिकेला अपेक्षापेक्षा तब्बल पन्नास लाख जास्त मिळाले आहेत. हा ठेका तीन वर्षांकरिता असणार आहे.

Exit mobile version