मिनीट्रेनमुळे माथेरानची मरगळ झटकली

पर्यटन व्यवसाय बहरला; व्यावसायिकांचा ऊर्जा
। नेरळ । प्रतिनिधी ।
जगभरातील पर्यटकांचे असलेली नॅरोगेजवर चालविली जाणारी नेरळ-माथेरान -नेरळ मिनीट्रेन तब्बल सव्वा तीन वर्षांनी पुन्हा रुळावर आली आहे. यामुळे माथेरानची मरगळ झटकली असून,पर्यटन व्यवसाय पुन्हा बहरला आहे.व्यावसायिकांनाही आता नवीन ऊर्जा मिळाली आहे. मे 2019 मध्ये अपघात झाल्यांनतर प्रवासी वाहतुकीसाठी बंद असलेली मिनीट्रेन ची नेरळ -माथेरान – नेरळ मार्गावरील वाहतूक सुरु व्हावी यासाठी घाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले होते. दरम्यान,22 ऑक्टोबर रोजी मिनीट्रेन पुन्हा नॅरोगेज मार्गावर आली असून माथेरानची महाराणी समजली जाणारी मिनीट्रेनला जागतिक वारसा मिळावा यासाठी आवश्यक सर्व कामे करण्यासाठी खासदार बारणे प्रयत्नशील राहणार असल्याचे बारणे यानी स्पष्ट केले.

मे 2019 मध्ये एका आठवड्यात दोनदा अपघात झाल्यानंतर मध्य रेल्वेकडून मिनीट्रेन बंद करण्याचा निर्णय 9 मे 2019 रोजी घेण्यात आला.माथेरान मधील प्रमुख कार्यकर्ते यांनी 10 मे रोजी थेट नवी दिल्लीत जात खासदार बारणे यांना माहिती दिल्यावर संसद अधिवेशन सुरु असल्याने बारणे यांनी अधिवेशनात विशेष वेळ मागवून घेत हा प्रश्‍न त्याच दिवशी लोकसभेत मांडला.त्यावेळी लोकसभेत रेल्वे मंत्री यांनी दुरुस्ती आणि प्रवाशांच्या सुरक्षेची सर्व कामे करून आपण पुन्हा नॅरोगेज मार्गावरील मिनीट्रेन सुरु करण्यात येईल असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर सतत पाठपुरावा करणारे खासदार बारणे यांच्या पाठपुराव्यानंतर नॅरोगेज मार्गावरील रूळ बदलणे,प्रवाशी यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे या कामांसाठी करोडो रुपयांच्या निधीची तरतूद करून घेतली. त्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागला असून नॅरोगेज मार्गावरील स्लीपर बदलण्याचे काम सुरु असून त्यासाठी काही दिवसांचे काम पूर्ण करायचे आहे.

नेरळ- माथेरान नेरळ या 21 किलोमीटर लांबीच्या अंतरावर चालविली जाणारी मिनीट्रेन सुरु करण्याचा निर्णय दोन चाचण्या घेतल्या नंतर घेण्यात आला.29सप्टेंबर 2022 रोजी नेरळ येथून प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी आणि मुंबई विभागीय महाव्यस्थापक शलभ गोयल यांनी नॅरोगेज मार्गाची पाहणी आणि मिनीट्रेनची नेरळ माथेरान नेरळ प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी चाचणी घेतली होती.

जादा गाड्यांची तरतूद करा
आगामी काळात मिनीट्रेनच्या नेरळ- माथेरान मार्गावर आणखी गाड्या सुरु करण्यासाठी यत्न असून माथेरान -अमन लॉज या दरम्यान चालविण्यात येणार्‍या शटल सेवेच्या फेर्‍यांची संख्या वाढवावी तसेच त्या शटल गाडीसाठी अतिरिक्त प्रवासी डब्बे जोडण्याचा प्रस्ताव आपण मध्य रेल्वेकडे दिला आहे.हे सर्व सुरळीत झाल्यावर नेरळ- माथेरान नेरळ मिनीट्रेन ला जागतिक वारसा होण्यासाठी रेल्वे मार्फत प्रयत्न केले जातील असे आश्‍वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी नॅरोगेजवर चालविल्या जाणार्‍या नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेनच्या प्रवासी वाहतूक सुरु झाल्यानंतर मिनीट्रेन बाबत माहिती माध्यमांना दिली.

Exit mobile version