। माथेरान । वार्ताहर ।
या पर्यटन नगरीत मुख्य प्रवेशद्वारापासूनच येणार्या पर्यटकांना शहरात येण्यासाठी वाहतुकीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातच आता मुख्य रस्त्यावर नव्याने लावण्यात आलेल्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांना अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पायी चालत येणार्या पादचार्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून रस्त्यात काही निकृष्ठ दर्जाच्या ब्लॉकची माती होऊन जागोजागी खड्डे पडले आहेत.
उन्हाळ्यात हे खड्डे बुजविण्यासाठी काही संघटनानी पुढाकार घेतला होता. परंतु, नेहमीच विकासाला विरोध करणार्या काही मंडळींनी पर्यावरण वाद्यांना सदर बाबतीत माहिती देऊन रस्ते आहेत त्याच परिस्थितीत राहावे असे बोलले जात आहे. याच रस्त्यावरून पर्यटक, शालेय विद्यार्थी, आबालवृद्ध त्याचप्रमाणे घोडे, ई रिक्षा जात असतात. या खड्डयामुळे अनेक पर्यटकांना पाय मुरंगळुन दुखापत झाली आहे. संबंधित प्रशासनाने ठोस उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे.
माथेरानच्या प्रशासनाने चारही बाजूला फिरून बघितलं तर माथेरान हे समस्याच्या फेर्यामध्ये अडकलेले आहे. त्यामध्ये मुख्य रस्त्याचे हे खड्डे जीवघेणे झालेले आहेत. याच खड्ड्यात पाय अडकून अनेक पर्यटकांना घोड्यांना दुखापत झालेली आहे.ही बाब अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिलेली असतानाही प्रशासन याबाबत विचार करत नाही.हे मोठे दुर्भाग्य आहे.
राकेश कोकळे
अश्वपालक माथेरान
एमएमआरडीए च्या मध्यमातून दस्तुरी नाका ते कॉनव्हेन्ट स्कुल नाका पर्यंत क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात आल्यामुळे पावसाळ्यात होणारी मातीची धूप थांबली आहे. हे काम करीत असताना चुकून अ परिपक्व क्ले पेव्हर ब्लॉक सुद्धा आले त्यामुळे गेल्या वर्षीच्या पहिल्या पावसात काही अ परिपक्व ब्लॉक झीजून मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे या खड्यात येथील नागरिकांचे पर्यटकांचे व घोड्याचे पाय मुरगळून अपघात होत आहेत. सध्या क्ले पेव्हर ब्लॉक चा प्रश्न न्याय प्रविष्ट आहे. तेंव्हा माथेरान नगर परिषदेने या खड्यात लाल दगड व गटारातील माती टाकून हे खड्डे त्वरित बुजविल्यास अनावधानाने होणारे अपघात टाळता येतील.
जनार्दन शंकर पारटे,
सामाजिक कार्यकर्ते माथेरान
सुप्रीम कोर्टाने नवीन क्ले ब्लॉक्स च्या कामाला स्थगिती दिली आहे मात्र ब्लॉक्स च्या दुरुस्तीला नाही पालिकेने तात्काळ क्ले ब्लॉक्सची दुरुस्ती करणे आवश्यक आहे कारण रस्त्यावरील खड्डेमय पाण्यात चालताना अंदाज येत नाही पाय मुरगळतो त्यामुळे पादचार्यांस धोकादायक आहे.
सुनिल शिंदे
सामाजिक कार्यकर्ते