पेझारी ढोलपाडा कबड्डी स्पर्धा; मातृछाया कुर्डूस संघ अंतिम विजेता

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

म्हसोबा क्रीडा मंडळ पेझारी ढोलपाडा यांच्यावतीने जिल्हा स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन शनिवार 2 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत संघांनी आपला प्रवेश नोंदविला होता. या स्पर्धेतील अंतिम लढत मातृछाया कुर्डूस विरुद्ध नवकिरण भेंडखळ या संघात झाली. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आपला बहारदार खेळ करत सामन्यात रंगत निर्माण केली. शेवटी या स्पर्धेचा अंतिम विजयी मातृछाया कुर्डूस हा संघ ठरला. या संघास रोख रक्कम 25 हजार व आकर्षक चषक तर उपविजेता नवकिरण भेंडखळ या संघास रोख रक्कम 15 हजार व आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी गणेश दिवलांग तर चतुर्थ क्रमांकावर पांडबादेवी रायवाडी या संघाला समाधान मानावे लागले. या दोन्ही संघास प्रत्येकी 11 हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ विनायक दिवलांग हा ठरला. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू समाधान मोरे यांस ( सायकल) , उत्कृष्ट चढाई हर्ष घरत (पंखा) , तर उत्कृष्ट पक्कड विराज राणे ( पंखा) ,पब्लिक हिरो प्रतीक धुमाळ (पंखा) ही आकर्षक बक्षिसे देऊन मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version