। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील आंबोले येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मातृछाया कुर्डुस अलिबाग संघाने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघास 21 हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर, गणेश दिवलांग अलिबाग संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत स्वयंभू जयहनुमान चिवे संघ तृतीय, धावीर रोहा संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. तर, उत्कृष्ट खेळाडू म्हणून समाधान मोरेला सायकल देऊन गौरविले. उत्कृष्ट चढाई अमीर धुमाळ, उत्कृष्ट पक्कड रोशन ठाकूर, पब्लिक हिरो म्हणून नितीन शिर्के या खेळाडूला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, तहसीलदार दिलीप रायन्नावार, माजी सभापती साक्षी दिघे, राष्ट्रवादी काँग्रेस सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे, सुधीर मांढरे, बळीराम दळवी, धनंजय म्हस्के, कैलास दळवी, कृष्णा दळवी, विठू दळवी आदींसह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उल्हास मित्रमंडळ आंबोले, ग्रामस्थ मंडळ आंबोले, महिला मंडळ आंबोले, उल्हास नाट्यमंडळ ठाणे, मुंबई, पुणे आदींनी परिश्रम घेतले.