वाशी-नवी मुंबई येथे मातृवंदन सोहळा

। अलिबाग । वार्ताहर ।
यमुनाई फाऊंडेशन-संस्कार वाचनालय आयोजित स्व.यमुना नाशिकेत भोईर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांचे सूपूत्र सुप्रसिद्ध आगरी नाटककार, आगरी साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष मोहन भोईर यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी राज्यातील गायन क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या गुणवंतांचा शाल श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन वाशी-नवी मुंबई येथील गुरव जाती समाज हॉल येथे गौरव केला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यातील ज्येष्ठ कवी प्रा.अरूण म्हात्रे होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते जयेंद्र खुणे होते. प्रमुख अतिथी साहित्यिक समाज सेवक इक्बाल कवारे, अ‍ॅड.प्रा.चंद्रकांत मढवी, हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे, फाऊंडेशनच्या संचालिका कवयित्री दमयंती भोईर, कवी पुंडलिक म्हात्रे, पत्रकार धनंजय गोंधळी, इतिहासकार के.एम.मढवी, साहित्यिक हरिभाऊ घरत, श्रीकांत पाटील, प्रकाश ठाकूर, स्मिता वाजेकर, हरिश्‍चंद्र माळी उपस्थित होते.

Exit mobile version