350 कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी
| खारेपाट | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील टाकादेवी स्पोर्ट क्लब माडंवा व ग्रामस्थांच्या विद्यमाने नारळी पौर्णिमेनिमित्त सुमारे दीडशे वर्षाची परंपरा असलेली राज्यस्तरीय भव्य कुस्ती स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न झाली. सदर स्पर्धेत आव्हानाची कुस्ती माऊली कोकाटे उपमहाराष्ट्र केसरी व दादा शेळके महाराष्ट्र केसरी यांच्यामध्ये रंगली.
या चित्तथरारक कुस्ती स्पर्धेत अखेर माऊली कोकाटे विजेता ठरला त्याला सुमारे दोन लाख रुपयांची पारितोषिक व भव्य गदा भेट मंडळाचे वतीने देण्यात आली. तसेच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी कोनगाव कल्याण 43 गुण मिळवून विजेता ठरला तर उपविजेता पिंपळास ठाणे जिल्हा 35 गुण तर तृतीय क्रमांक सापड संघ 29 गुण तसेच उत्तेजनार्थ चार संघांना पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील वाडगाव आखाडा, आवास आखाडा, पुणे आखाडा, चौधरी पाडा आखाडा यांना देण्यात आले. तसेच जोडाच्या कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रातील नामवंत पैलवान गणेश कोकरे-आदित्य कांबळे यांनी गणेश कोकरे वर विजय मिळवला तसेच प्रकाश कोळेकर यांनी सौरभ जाधव वर विजय मिळवला स्पर्धेत प्रेक्षणीय कुस्ती विजयवाडा वासिम जिल्हा विरुद्ध शाहरुख खान यांच्या झाली.
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मंडळाचे अध्यक्ष केशव पाटील, उपाध्यक्ष अशोक घरत, सल्लागार गजानन पाटील, सुनील म्हात्रे, मोहन नाकवा व मंडळाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रवीण ठाकूर काँग्रेसचे पदाधिकारी, उमेश ठाकूर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच सदस्य तसेच लोकप्रतिनिधी व लाखोंच्या संख्येने स्पर्धा पाहण्यासाठी जनसमुदाय उपस्थित होता, उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अंकुर घरत व गजानन पाटील यांनी केले. तसेच मांडवा येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कायदा व सुव्यवस्था मांडवा सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व त्यांचे सर्व सहकारी यांनी चोख बंदोबस्त करण्यात आला होता.
