शिवज्योत मोहिमेच्या मावळ्यांचा सत्कार

। अलिबाग । वार्ताहर ।
मुळशी तालुका शेकाप चिटणीस मोहन गोळे पाटील यांनी आयोजित केलेल्या शिवज्योत मोहिमेच्या मावळ्यांचा तसेच आग्रा ते राजगड शिवज्योत मोहिमेचे संकल्पक शिवभक्त मावळ्यांचा सत्कार कार्यक्रम पुणे जिल्यातील मुळशी तालुक्यात पिरंगुट या गावी पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शेकापचे कार्यालयीन चिटणीस राजेंद्र कोरडे, मध्यवर्ती सदस्य चंद्रशेखर नलावडे-पाटील, सागर आल्हाट, पुणे पदवीधरचे आमदार अरूण आण्णा लाड, स्थानिक आमदार संग्राम थोपटे, आमदार सुनिल शेळके, तानाजी मालुसरे व भाई केशवराव जेधे यांचे वंशज उपस्थीत होते.

Exit mobile version